आंदोलन करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल;

पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरात करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पुण्यातील व्यापाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अन्यथा आम्ही शुक्रवार (आज) पासून दुकाने उघडणार असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला होता.
जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पुण्यातील ३३ व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रंका यांच्या इतर व्यापाऱ्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. प्रकरणी पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी फिर्याद दिली आहे.
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता ३० एप्रिल पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
आंदोलन मागे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतर व्यापारी महासंघाच्या वतीने आज पासून आंदोलन मागे घेतले आहे. आज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवणार असे सांगितले होते. मात्र, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रंका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सोमवार पासून आम्ही दुकाने उघडणार असल्याचे फत्तेचंद रंका यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले.