|

ऑस्ट्रेलियन ‘तो’ गोलंदाज, ज्याची कारकीर्द सहकाऱ्यांच्या स्लेजिंगमुळे संपली!

ऑस्ट्रेलिया स्लेजिंग
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

क्रिकेट विश्वातील एक अजिंक्य संघ म्हणून ऑस्ट्रेलियन संघाकडे पाहिलं जातं. सामने कोणताही असो, पण ऑस्ट्रेलिया मात्र त्यात अव्वल राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. म्हणूनच क्रिकेट विश्वात एक वेगळाच ठसा उमटविण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ आपल्या आक्रमक खेळीसाठी जेवढा प्रसिद्ध, तितकाच तो प्रसिद्ध होता सामन्यादरम्यान स्लेजिंग करून प्रतिस्पर्धकाचं मनोधैर्य खचविण्यासाठी! आणि विशेष म्हणजे हे स्लेजिंग करताना ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या पुढे कोणत्या संघाचे खेळाडू आहेत याची अजिबात तमा बाळगत नाहीत.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे भारतीय आणि न्यूझीलंड खेळाडूंशी तसेच इंग्लंडच्या संघाशी बऱ्याच वेळा वाद देखील झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अँशेस मालिका जगप्रसिद्ध आहे. त्यावेळी हमखास स्लेजिंग पहायला मिळते.

मात्र, या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगच्या सवयीमुळेच स्वतः एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला आपलं करिअर संपावं लागलं होतं. नेमका काय प्रकार घडला जाणून घेऊया…

कोण होता हा खेळाडू ? आणि नेमकं काय घडलं होतं ?

साल होतं 1999… पाकिस्तानचा क्रिकेट संघ तीन टेस्ट सिरीज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आला होता. हे समाने ऑस्ट्रेलियातील होबर्ट येथील भव्य स्टेडियममध्ये होत होते. या सिरीजच्या दुसरा सामन्यात स्कॉट मुलर या ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडू वर बेताचा प्रसंग ओढावला.

त्याचं झालं असं की, स्कॉट धारदार गोलंदाजी करत होता. सामन्यात त्याने तीन विकेट देखील घेतल्या. पण गोलंदाजी करत असताना तो लाईन-लेंथच्या थोडा बाहेर जात होता. जेव्हा स्कॉट गोलंदाजी करायला लागला तेव्हा माईक वर एक आवाज ऐकायला आला. त्यात असं सांगितलं होतं की…

“he can’t bowl and he can’t throw”, म्हणजे “तो नीट गोलंदाजी ही करू शकत नाही आणि नीट फिल्डिंग ही करू शकत नाही”

काही वेळानंतर हा आवाज शेन वाॅर्नचा असल्याचं समोर आलं पण शेन वाॅर्नने हा आरोप फेटाळून लावला. आता मुद्दा उपस्थित होतो की, आपल्याच संघाच्या खेळाडूविरूद्ध शेन वाॅर्नने स्लेजिंग का केली असेल?

त्याला कारण होतं ड्रेसिंग रूममधील वातावरण. ड्रेसिंग रूममध्ये मस्ती करताना एकमेकांची स्लेजिंग होत असे. मात्र याचा परिणाम खेळाडूंच्या नात्यावर झाला. शेन वाॅर्न आणि स्कॉट मुलर यांच्यात तणावाचा वातावरण राहिलं.

भर मैदानात झालेली स्लेजिंगची गोष्ट स्कॉटच्या प्रचंड मनाला लागली. तो मनस्वी दुखावला. ही गोष्ट संपूर्ण क्रिकेट विश्वात गाजू लागली. पण शेन वॉनने हे व्यक्तव्य मी म्हणलोच नाही आणि हा माझा आवाज नाही असेल सांगितले होतं.

स्लेजिंग केलं होतं तरी कुणी ?

“लोग कह रहे थे कि उनको ऐसा मैंने बोला है. लेकिन जैसा कि आप वीडियो में देख सकते है. मैं भागकर आधी पिच तक आ गया था, और मेरे हाथ पीछे थे. अचानक, इस पर एक बड़ी जांच हुई कि मैंने ऐसा कहा या नहीं. उस समय मैं टीम का उप–कप्तान था और देखो, अगर मैंने ऐसा कहा होता तो मैं कह देता कि मैंने ये कहा है. लेकिन मैंने ऐसा नहीं कहा और किसी ने मुझ पर विश्वास भी नहीं किया”, असं शेन वाॅर्न म्हणाला होता.

2005 साली, एका चर्चेत स्कॉटने त्यावेळेस घडलेल्या विषयावर त्याचं मत मांडलं…

“त्यावेळी जे काही झालं त्यामुळे मला नेहमी बोलता संकोच वाटतो. या घटनेनंतर मला अनेकांनी फोन केला, ही गोष्ट आणखी वाढवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मी या सगळ्या गोष्टींच्या पुढे गेलो होते. त्यावेळी तिथे एक अंपायर होते, त्यांना माहिती होतं की त्यावेळी नेमकं काय झालं”

अनेक वृत्तपत्रातून आणि टिव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून या गोष्टीचा खुलासा करण्यात आला. चर्चा झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले आणि शेवटी दुखावलेल्या स्कॉटने पुढच्या चार महिन्यात क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली आणि ऑस्ट्रेलियाने एक तरूण खेळाडू कायमचा गमावला.

हे ही वाचा की-


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *