Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचाअतिक्रमणाचा श्रीगणेशा नगरसेविकेने केला स्वत:पासून!

अतिक्रमणाचा श्रीगणेशा नगरसेविकेने केला स्वत:पासून!

हा प्रकार कुठे घडला ते पहा..

पुणे: कात्रज, धनकवडी, बालाजीनगरमार्गे जांभुळवाडी, आंबेगाव, नऱ्हे भागात जाण्यासाठी दत्तनगर परिसरात वर्दळ असते. रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुक कोंडी होते. यासाठी रस्ता रुंदीकरणासाठी नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी पालिकेकडे पाठपुरावा करीत रस्ता रुंदीकरणासाठी १ कोटी ९० लाख, ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग व भूमिगत केबल यासाठी १ कोटी ५ लाख निधी उपलब्ध करून दिला आहे.

दत्तनगर ते शनीनगर पर्यंत ६० फुटी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली असून रस्त्यालगतची झाडे काढणे, अडथळा ठरणाऱ्या मिळकती, तसेच अतिक्रमित क्षेत्र धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एमएसईबीच्या कामांनाही वेग आला आहे.

काम सुरु असताना नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी स्वतःचंच जनसंपर्क कार्यालय तोडलंय. या सगळ्या घटनेमुळे स्मिता कोंढरेंची चर्चा सगळीकडे होत आहे.

रुंदीकरणात अडथळा ठरणारे स्वतःच्या जागेतील जनसंपर्क कार्यालय पाडत नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. अतिक्रमणाची सुरवातच अशी झाल्यामुळे नागरिकांमधील नाराजी सुद्धा कमी होताना दिसतीये. अशी सुरवात करून स्मिता कोंढरे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. ‘हा रस्ता रुंद झाल्यानंतर वाहतुक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे रस्ता विकसित करताना अडथळा ठरणारे आमच्या स्वतः च्या जागेतील माझे जनसंपर्क कार्यालय पाडून मी कामाला सुरवात केली आहे,असं त्या म्हणाल्या आहेत. असा आदर्श ठेवल्यामुळे नागरिकही या नागरसेविकेचं कौतुक करतायत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments