Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचाकोरोनाची दहशत! क्राईम रेट घटला

कोरोनाची दहशत! क्राईम रेट घटला

पुणे: लॉकडाऊनच्या काळात दैनंदिन जीवनात बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला. कोरोनाचे पडसाद आपल्याला प्रत्येक क्षेत्रावर दिसून आले. आता लॉकडाऊनच झालं म्हटल्यावर आपणच काय तर चोरांना सुद्धा घरात बसावं लागलंचं असणार ना. गुन्हेगारी क्षेत्रावर चक्क कोरोनाची दहशत असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रातला क्राईम रेट घटल्याचं समोर आलंय.  

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, हत्या, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी आदी घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. चोरट्यांनी बंद दुकानांना लक्ष्य केल्याचे दिसते. चोरट्यांनी बहुतांश बंद असलेली दुकानं आणि स्टॉल्स फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना हुंड्यासाठी छळ, विनयभंग, महिला आणि मुलांच्या अपहरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झालीये. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. दुसरीकडे याच कालावधीत आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येतंय.

महाविकास आघाडीने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षी वाढ झाली नसल्याची राष्टीय गुन्हे नोंद संस्था (एनसीआरबी) च्या अहवालात नमूद करण्यात आलीये. कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान राज्यातील क्राईम रेट घेतल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलंय. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालात बलात्काराच्या गुन्ह्यात ११ टक्क्यांनी घट,गुन्हे सिद्ध करण्याचा दर ६२ टक्के झाल्याचं सांगण्यात आलंय.शिक्षा होण्याचं प्रमाणही वाढल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. त्याचबरोबर दंगे,चोरी फसवणूक या गुन्ह्यांमध्येही घट झाल्याचं त्यांनी सांगितलंय. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments