Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचा११ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु

११ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु

वॉशिंग्टन: लहान मुलांना करोनाच्या संसर्गाची शक्यता वयस्कर व्यक्तींपेक्षा कमी असली तरी करोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. लहान मुलांना करोना संसर्गाचा अधिक त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच लहान मुलांसाठीही लस निर्माण करण्याचा सल्ला अनेक आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

करोनाची लस निर्माण करणाऱ्या फायझर कंपनीने कालपासून (२५ मार्चपासून ) ११ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु केल्याची माहिती दिली आहे. जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचं मानलं जात आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार फायझरने सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्याचं स्पष्ट केलं आहे. “आमची सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने आम्ही फायझर-बायोएनटेक कोव्हिड १९ लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील चाचणी करण्यासाठी जागतिक मोहिमेअंतर्गत अभ्यासादरम्यान निरोगी बालकांना लस दिली आहे,” असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

लहान मुलांवर लसीसंदर्भातील चाचण्या सुरु करण्याचा आम्हाला अभिमान असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबातील अनेकजण करोनाची लस लहान मुलांना देण्यासंदर्भातील चाचण्यांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. कंपनी लहान मुलांना देण्यात येणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची निर्मिती करण्याच्या विचारात असून त्यासंदर्भातच चाचण्या सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

कंपनीने याआधीच १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी करोनाप्रतिबंधक लसीची चाचणी सुरु केलीय. अमेरिकेमध्ये आपत्कालीन प्राधिकरणाने १६ वर्षे आणि त्यावरील व्यक्तींना लसीकरणाची परवानगी दिली आहे. फायझर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेकाने लहान मुलांवरील लसींच्या चाचण्या करण्यास सुरुवात केलीय. तर जॉन्सन ॲन्ड जॉन्सन सध्या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीवर संशोधन करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments