देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कोरोनाची लस
मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात अनेक राजकीय नेत्यांनी लसीकरण करून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, खासदार सुप्रिया सुळे यांनी लस टोचून घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबईतील जे.जे. रुग्णालयात लस टोचून घेतली होती. यावेळी डॉ. तात्याराव लहाने हे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आली आहे.
दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लस घेतली. यानंतर त्यांनी “आज मी एम्स हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लशीचा पहिला डोस घेतला. आपल्या डॉक्टर तसंच शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत कोरोनावर लस शोधून काढली आहे.आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जरूर घ्यावी”, असं आवाहनही जनतेला केलं होतं.
दरम्यान आज दुपारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कोरोनाची लस घेतली आणि हे वॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, अशी विनंती सुद्धा जनतेला त्यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी जे जे रुग्णालयात जाऊन आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
रोज तीन लाख व्हॅक्सिनेशन
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यसरकाराचा अग्रेसिव्ह व्हॅक्सिनेशन करून घेण्याचा मानस आहे. रोज तीन लाख व्हॅक्सिनेशन करण्यात येणार असून या सगळ्यावर मी कटाक्षाने लक्ष ठेऊन असेल असं काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्यात कोरोनाचा उद्रेक झालाय त्यामुळे आठवड्याला २० लाखापेक्षा जास्त व्हॅक्सिनेशनचे डोसेस राज्यसरकारला देण्यात यावेत अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचंही काल टोपे यांनी सांगितलं.