भारतातील कोरोनाची परिस्थिती गंभीर – WHO

दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले असून दररोज तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळून येते आहेत. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूतही मोठी वाढ झाली आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेड्रोस यांनी सोमवारी भारतातील कोरोनाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
भारतात दररोज आढळून येणारे कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू यावर चिंता व्यक्त करतांना तेड्रोस म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना सुद्धा भारताला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे. भारतातील ही स्थिती हृद्द्रावक आहे.
तसेच देशात अचानक रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. रुग्णाला बेड, ऑक्सिजन मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्योगपतीकडे मदत मागितली आहे. तसेच दिल्लीत सात दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.
तेड्रोस म्हणाले, भारतातल आरोग्य संघटना जमेत ती सर्व मदत करत आहेत. महत्त्वाचे उपकरणे आणि आवश्यक त्या बाबी पुरविण्याचे काम करत आहेत. पोलिओ आणि टिबी इतर मोठ्या कार्यक्रमातील २ हजार ६०० पेक्षा अधिक तज्ञांना भारतात पाठविण्यात आले असल्याचे तेड्रोस यांनी सांगितले.
याआधी भारतातून इतर देशांना लस पाठविण्यात येत होती ती आता बंद करण्यात आली आहे. भारतातील परिस्थिती गंभीर झाल्यानंतर ते बंद करण्यात आल्याचे तेड्रोस यांनी सांगितले.