कोरोना : Google चे सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडून भारताच्या मदतीसाठी मोठी घोषणा

Corona: Google CEO Sundar Pichai's big announcement to help India
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली : देशभरात वेगाने वाढणाऱ्या कोरोना संकटाच्या काळात Google चे सीईओ सुंदर पिचाई मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोरोनामुळे भारतात निर्माण झालेली गंभीर स्थिती पाहता त्यांनी १३५ कोटी रुपयांच्या रिलीफ फंडची घोषणा केली आहे. त्याशिवाय मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी भारताला मदत करण्यासाठी प्रयत्नशील असून ऑक्सिजन उपकरणंही खरेदी करण्यासाठी मदत करणार असल्याचं नडेला यांनी सांगितलं.
Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी अनुदान देण्यासाठी यूनिसेफ आणि गेटइंडियाला १३५ कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. त्याशिवाय Google आणि त्यांची टीम मेडिकल सप्लायही करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच हाय रिस्क कम्युनिटीची मदत करणाऱ्या संघटनांनाही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सुंदर पिचाई यांनी एक ब्लॉग पोस्ट शेअर केली आहे, ज्यात भारताला गंभीर स्थितीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांविषयी सविस्तर सांगितलं आहे. १३५ कोटी रुपयांच्या फंडिंगमध्ये Google.org कडून दोन ग्रेन सामिल आहेत.
यात पहिलं अनुदान गेटइंडियासाठी आहे, जेणेकरुन संकटाग्रस्त कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन खर्चात मदत करण्यासाठी रोख रकमेची मदत केली जाऊ शकते. दुसरं अनुदान यूनिसेफसाठी जाईल, जे ऑक्सिजन आणि चाचणी उपकरणांसह त्वरित वैद्यकीय पुरवठा होण्यास मदत होईल जी या क्षणी सर्वात जास्त आवश्यक आहे.

मायक्रोसॉफ्ट महत्त्वपूर्ण ऑक्सिजनच्या डिव्हाईस खरेदीसाठीही मदत करणार
मोहिम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देणग्याही अनुदानामध्ये समाविष्ट केल्या आहेत. ब्लॉग पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, आतापर्यंत ९०० हून अधिक Google कर्मचाऱ्यांनी हाय रिस्कवाल्या देशांना पाठिंबा देणाऱ्या संस्थांना ३.७ कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ट्विट करत सांगितलं, की भारताची सध्याची स्थिती पाहून अतिशय दु:ख होत आहे. अमेरिकी सरकार मदतीसाठी पुढे आल्याने मी त्यांचा आभारी आहे. मायक्रोसॉफ्ट या संकटकाळात मदतीसाठी संसाधनं, तंत्रज्ञानाचा वापर करत राहील. तसंच महत्त्वपूर्ण ऑक्सिजनच्या डिव्हाईस खरेदीसाठीही मदत करेल.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *