गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा. याचिकाकर्त्याला झापल
मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली अनिल देशमुख यांच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. तसेच लोकप्रियतेसाठी केले असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने फटकारले आहे.
जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यावर न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया नोंदवत लोकप्रियतेसाठी याचिका केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. नायामुर्ती एस.एस. शिंदे, मनीषा पिटाले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
न्यायालयाने पाटील यांना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली होती. यावेळी अॅडव्हॊकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. यावेळी त्यांनी पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने याचिका सादर केल्याचे सांगितले.
दरम्यान, पाटील यांनी अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटीच्या आरोपां नंतर मलबारहिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भ्रष्टाचाराचे आरोप नष्ट करण्यापूर्वी भ्रष्टाचार कायद्याखाली मंत्र्याला आणि सबंधित व्यक्तीला अटक व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. या तक्रारीत अनिल देशमुख, सचिन वाझे यांचे नाव टाकण्यात आले होते.