Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचाआमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन

मुंबई: देगलुर – बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच काल कोरोनाने निधन झाले. ते ५५ वर्षाचे होते. कोरोनाचे निदान झाल्यावर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेत असताना शुक्रवारी यांची प्राणज्योत मावळली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून माहिती दिली.

देगलुरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानं राज्याच्या विधीमंडळातील अभ्यासू लोकप्रतिनिधी, मराठवाड्यातील संघर्षशील नेतृत्व, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला निकटचा सहकारी आज आपण गमावला आहे. अंतापूरकर कुटुंबिय आणि देगलूरवासियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अस म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केले आहे.

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना काही दिवसापूर्वी कोरोणाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तिथे उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
रावसाहेब अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटर्तीय होते.

माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले.
आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना. अस म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments