Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचाकॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठिकठिकाणी कडक निर्बंध सुद्धा लावण्यात येत आहे. कोरोनाने विविध पक्षीय नेत्यांना देखील सोडलेले नाही. आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांना सौम्य लक्षण दिसू लागल्यान चाचणी केल्यानंतर अहवाल पाॅझिटीव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोन दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.


राहुल गांधी ट्वीट करताना म्हणाले की…
कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments