अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या घरावरील आयकर छापे संदर्भात संपूर्ण माहिती

मुंबई: दिग्दर्शक अनुराग कश्यप, मधु मंटेना, विकास भल आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर बुधवारी आयकर विभागाने छापे मारले. ही छापेमारी रात्रभर सुरु होती. त्यांच्या पुण्यातील ऑफिस मध्ये सुद्धा छापेमारी केली. केंद्र सरकारने या छापेमारीचे समर्थन केले आहे. तर ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. फँटम फिल्म कंपनीत जो पैसा कमावला त्याची योग्य माहिती दिली नसल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
या घटना क्रमातील काही ठळक मुद्दे:-
- आयकर विभागाच्या वतीने पुणे, मुबई येथे ३० ठिकाणी छापे मारले. यात अजून काही अभिनेते आणि त्यांचे काम पाहणारी क्वान कंपनीवर धाड टाकण्यात आली आहे.
- त्यांच्यावर कर चुकाविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- दिग्दर्शक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, मधु मंटेना आणि विकास भल यांनी फॅटम फिल्म कंपनीची २०११ साली स्थापना केली होती. २०१५ मध्ये रिलायंस इंटरटेनमेंट यात ५० टक्के गुंतवणूक केली. कश्यप-मोटवानी- मंटेना-भल यांच्या कडे ५० टक्के मालकी तर रिलायंस इंटरटेनमेंट ५० टक्के मालकी कंपनीची होती.
- फॅटम फिल्म कंपनीने लुटेरा. क्वीन, उग्ली, मसान सारखे चित्रपट बनविले.
- फॅटम फिल्म कंपनीचे सहमालक विकास भल यांच्यावर २०१८ मध्ये कंपनीत काम करणाऱ्या एका सहकारी महिलेले अत्याचार आरोप केला नंतर कंपनी बंद करण्यात आली.
- त्यानंतर कश्यपने गुड बॅड फिल्म नावाची कंपनी तर मोटवानी याने आंदोलन फिल्म नावाची फिल्म कंपनी सुरु केली.
- तीन वर्षा नंतर फॅटम फिल्म मधून कश्यप,मोटवानी भल बाहेर पडले
- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. त्यात त्यांनी जर तुम्ही केंद्र सरकार विरोधात बोलला तर तुमच्या केंद्रीय संस्था मार्फत तुमच्यावर छापे मारण्यात येते. कश्यप आणि तापसी यांनी वेळोवेळी केंद्र सरकार विरोधात आवाज उठविल्याने त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे घातले आहे.
- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवाब मलिक यांचा आरोप फेटाळून लावला. आकार विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी छापे मारले असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
- कश्यपने जेएनयु आणि शाहीन बाग येथील आंदोलनाला पाठींबा दिला होता. तसेच केंद्र सरकारच्या अनेक धोरणावर सडकून टिका केली होती. तसेच तापसी पन्नू अनेक मुद्यावर केंद्र सरकारला धारेवर धरल आहे.