माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार
पुणे : कोथरुड च्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुऱ्हाळ चालविणाऱ्या महिलेला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला यांनी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.
कोथरुड भागातील रामबाग कॉलनीतल्या गणेश कुंज सोसायटी समोर एक रसाच गुऱ्हाळ आहे. हे गुऱ्हाळ अनधिकृत आहे आणि नागरिकांना त्रास होतो अशी तक्रार सोसायटीत राहणाऱ्याची आहे. गुऱ्हाळ मुळे सोसायटीत डास आणि माशा वाढल्या असून काही जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे गणेश कुंज सोसायटीतील नागरिकांनी सांगितले.
त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी मेधा कुलकर्णी यांच्या मदतीने ते गुऱ्हाळ हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी हे गुऱ्हाळ चालविणाऱ्या दिपाली चव्हाण आणि त्यांच्या पतीशी झटापट झाली.
यावेळी मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप दिपाली चव्हाण यांनी केला.
मेधा कुलकर्णी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच दिपाली चव्हाण चालवत असलेले गुऱ्हाळ अनधिकृत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान त्यांनी आपल्या fecebook page वरुण या बाबत खुलासा केला आहे.