लॉकडाऊन दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई द्या
मुंबई: कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता काही जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यात पहिल्या लाटेत आढळून आलेल्या रुग्ण संख्येपेक्षा अधिक रुग्ण दररोज आढळून येत आहे. राज्यातही २ एप्रिल नंतर लॉकडाउन होईल अशी शंका वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला याबाबत सूचना सुद्धा दिल्या आहेत. मात्र याला काही गटांकडून विरोध करण्यात येत आहे. महाविकास आघडीतील सुद्धा याबाबत स्पष्टता नाही. परिणामी जर लॉकडाउन लावावे लागले तर काही गोष्टी या लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे असे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाउन लावण्यापूर्वी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. तसेच लॉकडाउनचां कालावधी कमी ठेवावा अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे. तसेच यादरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई तास पाश्चिमात्य देशा प्रमाणे रोख रक्कम थेट बँक खात्यात जमा करावी. प्रसंगी यासाठी आमदार, खासदार निधीचां वापर करावा अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.
खासगी वाहतूक सर्वसामान्य जनतेला प्रवासाची मुभा द्यावी. तसेच शेतीमाल व इतर औद्योगिक मालाची वाहतूक सुरू ठेवून पुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने कोणतीही पूर्वसूचना, नियोजन न करता लॉक डाउन केले होते.सारासार विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. व भारतातील 3 कोटीहून अधिक लोक दारि्र्यरेषेखालील गेले आहेत. त्यामुळे लोकांना विश्वासात घेवून आणि अर्थव्यवस्थेचे कमीत कमी कशे नुकसान होईल आणि कोरोना ची साखळी तुटेल अशा प्रकारे लॉक डाउननचे नियोजन करावे अशा सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहेत.