लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा
पात्र ठरलेल्यानी लस घेण्याचे केले आवाहन
मुंबई: कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. दोन दिवसानंतर बैठक होणार असून त्यानंतर लॉकडाऊन बाबत निर्णय होईल अशी माहिती त्यांनी दिली. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन लस घेतली.
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले, राज्यातील काही शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे काही शहरात लॉकडाऊन करावे लागणार आहे. बाहेर होणारी अनावश्यक गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षेचे नियम पाळावे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. हाताबाहेर जाऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यायला हवी. बंधन पाळणे गरजेचे. काही शहरात बाधितांची संख्या वाढत आहे अशा ठिकाणी कडक लॉकडाऊन करावे लागणार आहे. दोन दिवसात बैठक होणार यानंतर निर्णय घेण्यात येईल आणि जिथे गरज आहे तिथे लॉकडाऊन करणार असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतली. त्यानंतर ते म्हणाले, लसीचे कुठलेही दुष्परीणाम नाहीत. लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या सर्वांनी लस घ्यावी. लस घेणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.