Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचाराज्यात १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना सध्या लस मिळणार नाही लस...

राज्यात १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना सध्या लस मिळणार नाही लस : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ मे पासून देशासह राज्यात सुध्दा १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी करण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. असे असताना तुटवड्यामुळे राज्यात १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस मिळणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, १ मे पासून राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस मिळणार नाही. लस न मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे राज्याचा लसीचा पर्याप्त साठा उपलब्ध नसल्या कारणाने तात्काळ लसीकरण सुरु होणार नाही. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असून नागरिकांनी लसीकरणकेंद्रावर गर्दी न करण्याचे सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या Co-win App वर नोंदणी करुन लसीकरण केंद्रावर जाण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागिरकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र असणार व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी वेगले लसीकरण केंद्र असणार असल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments