सिनेमा केवळ ९९ मध्ये; ‘सिनेमा लवर्स डे’ साठी खास सवलत..!!!

सिनेमा लव्हर्स डे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

सिनेविश्वात आणि सिनेमा प्रेक्षकांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं नातं आहे. सध्याचा काळ पाहता वेगवेगळे ट्रेंड असो किवा वेगवेगळी टिकाटिपण्णी असो हे प्रेक्षकच घडवून आणतात. पण, यासोबत असा ही प्रेक्षक वर्ग आहे तो खरच सिनेमा वर प्रेम करतो, त्याला आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान देतो.

अशाच सर्व प्रेक्षकांमुळे सिनेमा चालतो. प्रेक्षकांनी सिनेमा पाहावा हाच सिनेमा बनवतानाचा प्राथमिक मुद्दा असतो. आणि हे प्रेक्षकच असतात जे सिनेमा यशस्वी करू शकतात किंवा पाडू शकतात.

याच सिनेमाप्रेमींसाठी आज एक खुशखबर आहे. २० जानेवारी २०२३ हा दिवस “सिनेमा लवर्स डे” म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रेक्षकांना केवळ ९९ रुपयांमध्ये थेटर मध्ये जाऊन कोणत्याही सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. सध्या सुरु असलेल्या जवळपास सर्व सिनेमांवर ही सूट मिळणार आहे. थेटर मधल्या महाग तिकिटांमुळे सिनेमाचा आनंद न घेता येऊ शकणाऱ्या लोकांना याचा नक्कीच फायदा होईल.

याआधी देखील २३ सप्टेंबर रोजी ‘सिनेमा डे’ साजरा केला होता ज्यात तिकिटांचा दर ७५ रुपये होता. यादिवशी देखील चित्रपट प्रेमींनी थेटरमध्ये गर्दी केली होती. स्वस्त दारात तिकीट असल्यावर प्रेक्षक गर्दी करतात हे पाहून सिनेमांचे तिकीट दर हे सामान्य माणसाला परवडणारे नाहीत ते कमी करण्यात यावे अशी मागणी अनेकांनी केली. पण यावर काही विचार झाले आहेत हे सध्याचे दर पाहता तरी लक्षात येत नाही. तरी आजच्या या सवलतीला प्रेक्षक भरभरून प्रतीसाद देतील यात शंका नाही.

सिनेमा लवर्स डे अंतर्गत केवळ आजच्याच दिवशी ही सवलत लागू असेल. यात प्रेक्षक अवतार, वारीसू, भेडिया, द काश्मीर फाइल्स (जो परत याच दिवसासाठी खास प्रदर्शित होतोय) यासह मराठी चित्रपट वेड, वाळवी हे देखील ९९ रुपयांमध्ये पाहू शकतात. परंतु बर्याचशा लहान शहरांमध्ये ही सवलत लागू नाहीये, तसेच थेटर मधील प्रीमियम रीक्लायनर या प्रकारात तिकीट दर जवळपास १९९ रुपये इतका असेल.

प्रेक्षक सिनेमा पाहायला येतात, तिकीट खरेदी करतात आणि म्हणूनच सिनेमा चालतो, याच प्रेक्षकांचे आभार मानता यावे, त्यांचा सिनेमाप्रती प्रेम साजरा करता यावं, अधिकाधिक लोकं सिनेमाकडे आकर्षित व्हावे, याच भावनेने हा दिवस साजरा केला जाणार आहे.

सध्याच्या काळात सिनेविश्वात ज्या हालचाली चालू आहेत ज्यामुळे सिनेमांवर खूप विपरीत परिणाम होत आहे. सिनेमा बनतायत पण ते पाहण्यासठी प्रेक्षक थेटर पर्यंत जात नाहीत. आणि याचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर होत आहे. हे सगळे कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होऊ शकतो.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *