चिंटूचे जोक विनोद असतात तसंच राणेंचं वक्तव्य – नीलम गोर्हे

नीलम गोर्हे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

शिवसेना नेत्या नीलम गोर्हे या शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्याचा बातमीनं उलटसुलट चर्चांना तोंड फुटलं होत. त्यावर नीलम गोर्हे यांनी स्पष्टीकरण दिलंय. तसंच नारायण राणेंच्या वक्तव्यावर पलटवार केला.

एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत खुलासा करताना त्या म्हणाल्या, ही भेट राजकीय नव्हती. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही तिथे उपस्थित होते हा निव्वळ योगायोग आहे.

नारायण राणे म्हणाले होते की, निलमताई शिवसेनेत नाराज आहेत. मीच त्यांना शिवसेनेत थांबवलं नाहीतर त्या आतापर्यंत शिवसेनेत राहिल्या नसत्या’.

त्यावर नीलम गोर्हे म्हणाल्या, “मला वाटतं चिंटूचे जोक जे विनोद असतात तसा हा प्रकार आहे. नारायण राणे आणि माझं मागील पाच-सहा वर्षांमध्ये कधी बोलणंही झालं नाही. ते २०१५-१६ च्या सुमाराला विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यावेळेला बोलताना आम्ही केवळ जय महाराष्ट्र किंवा नमस्कार वगैरे बोलायचो.

एकदा भाषण झाल्यानंतर मला आणि अनिल परबांना सांगून गेले होते की चांगलं बोललात तुम्ही. यापलीकडे माझा नारायण राणेंशी काहीही संवाद नाही किंवा संपर्कही नाही’, असंही त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “त्यांनी ज्यावेळी २००४ मध्ये शिवसेना सोडली त्यानंतर त्यांच्याशी औपचारिक काय अनौपचारिक भेट सुद्धा झालेली नाही. कुठे कार्यक्रमातही तसा संबंध येत नाही. त्यामुळे मनाने अंदाज बांधून ते काहीतरी बोलले असतील. त्यात काही तथ्य नाही असं मला वाटतं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *