मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान यांना परत एकदा फोन; केली ‘ही’ मागणी

मुंबई: देशभर कोरोनाने थैमान घातला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा साठा नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या २४ तासात ३ वेळा फोन केला आहे.
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन राज्याला मिळावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केली. दोंघांमध्ये ऑक्सिजन तुटवड्या बाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
काल मुंबईतील काही रुग्णालयात ऑक्सिजन तुटवडा जाणविल्याने अनेक रुग्णांना इतर हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करावे लागले होते.
हवाई मार्गाने ऑक्सिजन मिळावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी राज्यातील ऑक्सिजन तुटवडा बाबत चिंता व्यक्त केली होते. केंद्र सरकारकडे इतर राज्यातील ऑक्सिजन मिळावे अशी विनंती केली होती. पश्चिम बंगाल ईशान्य भारतातील काही राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात येईल असे केंद्र शासनाने कळविले होते. मात्र रस्त्याने ऑक्सिजन पुरवठा मिळविणे सोपे नाही त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाई दला मार्फत ऑक्सिजन पुरवठा व्हावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कडे यांच्याकडे केली होती.