अयोध्येतील राम मंदिराला दिलेल्या वर्गणीतील ‘एवढ्या’ कोटींचे धनादेश वटलेच नाही

अयोध्या: अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरातून वर्गणी गोळा करण्यात आली आहे. जगभरातून जवळपास ५ हजार कोटी पेक्षा आधी निधी स्वरुपात ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ला प्राप्त झाला आहे. मात्र, यातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. देणगीस्वरुपात प्राप्त झालेल्या एकून धनादेश पैकी तब्बल १५ हजार चेक बाउन्स झाल्याचे समोर आले आहे. याची एकूण रक्कम २२ कोटींच्या आसपास आहे.
भव्य मंदिराच्या निर्माणासाठी केंद्र सरकारने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे भूमिपूजन सोहळा काही दिवसापूर्वी पार पडला होता.
श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून लोकवर्गणी जमा करण्यात आली. १५ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान देशाभरातून मंदिरासाठी देणगी गोळा करण्यात आली. या ट्रस्टकडे जवळपास ५ हजार कोटीहून अधिक रक्कम देणगी स्वरुपात मिळाली आहे.
दरम्यान, देणगी मध्ये मिळालेल्या चेक्स्पैकी १५ हजार चेक बाउंन्स झाले आहे. ते पंधरा हजार चेक वटले नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. या १५ हजार चेक मध्ये २२ कोटींची देणगी अडकली आहे. यातील २ हजार चेक आयोध्येतून आले आहे. उर्वरित १३ हजार चेक देशभरातून मिळाले आहेत.
ज्या व्यक्तींचे हे चेक बाउन्स झाले आहे त्यांना परत पाठविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिली.