|

‘या’ दैदिप्यमान कामगिरीमुळे चंद्रकांत दादांनी एका महिलेचा सुरक्षित कोथरूड मतदार संघ घेतला

Chandrakant Dada took the safe Kothrud constituency of a woman due to his glorious performance
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

रूपाली चाकणकरांची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका

पुणे : राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. २ मे रोजी देशातील पाच राज्यांचा निवणूक निकाल समोर आला आहे. तर पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. यामध्ये बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. मात्र पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचा आमदार विजयी झाला आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल आपले मत व्यक्त करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. यामध्ये ‘स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला’, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. .

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ‘चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर पुर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे, आपल्याला आपला मतदार संघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदार संघ निवडावा लागला……सुज्ञास फार न सांगावे लागे!! जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD मधील प्रकरणे अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होणार आहे. साधी आपली ग्रामपंचायत सुद्धा ज्यांना आपल्या ताब्यात ठेवता आली नाही अशा आमदार महोद्यांनी मग्रूरपणा दाखवत इतरांशी बोलू नये. आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत, थोडं मागे वळून पाहिलं तर आपला इतिहास आपल्या लक्षात येईल.’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कॅबिनेटमत्री छगन भुजबळ यांना लक्ष करत टीका केली होती यामध्ये ते म्हणाले होते की, ”महाविकास आघाडी सरकारच्या ज्या ज्या मंत्र्यांवरच्या केस कोर्टात पेंडिंग आहेत, त्या सर्वांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी ‘विचारणा’ पिटीशन दाखल करणार आहे. जे स्वतः जामिनावर सुटलेले आहेत, अशांनी आदरणीय पंतप्रधानांबद्दल बोलायची हिंमत करू नये.” अशी टीका त्यांनी काल छगन भुजबळ यांच्यावर केली होती. या टिकेवर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून भाष्य केले आज भाष्य केले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *