|

केंद्र सरकारने पक्षपात न करता सर्व राज्याला मदत करायला हवी–राहुल गांधी

कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली: राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असतांना लसीवरून राजकारण तापले आहे. राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम काही ठिकाणी बंद झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

            त्यात ताहुल गांधी यांनी म्हटले आहे कि, आवश्यकता आहे त्यांना लस मिळायला हवी आणि तत्त्काळ लसीच्या निर्यातीवर बंदी आणायला हवी. तसेच लस लवकर उपलब्ध व्हायला हवी अशी मागणी पत्र लिहून केली आहे.

त्याचबरोबर वाढता कोरोनाचे संकट पाहता लसीची कमतरता एक गंभीर समस्या आहे. ‘उत्सव’ नाही आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपाती न करता सर्व राज्यांना मदत करायला हवी. आपल्या सर्वांना मिळून हा महामारीला हरवायचे आहे. अस राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

देश या क्षणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झगडत आहे. आपल्या वैज्ञानिक आणि डॉक्टर यांनी मिळून लस बनवली आहे. मात्र सरकारने लसीकरन मोहीम योग्य राबविली नाही. देशात हळुवार पणे लसीकरण सुरु आहे. ७५ टक्के लोकांना देण्यासाठी काही वर्षाचा कालावधी लागेल. अस देखील राहुल गांधी यांनी बोलून दाखवलं आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *