इंग्लंडच्या जो रूटचं ‘विराट’ दीडशतक! दिग्गजांच्या यादीत ‘किंग कोहली’ ला टाकलं मागे
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट गेल्या काही महिन्यांपासून मोठी खेळण्यामध्ये सतत अपयशी ठरत राहिला आहे. अखेर वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेमध्ये त्याने स्वत:ला चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली आहे. त्या बदलाचा त्याला चांगलाच फायदा झाला. अँटिग्वा येथील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये १०९ धावांची शानदार खेळी केल्यानंतर, रुटने बार्बाडोस येथील दुसऱ्या कसोटीतमध्येही विक्रमी १५३ धावांची खेळी केली….