‘गती कमी होताच कळतं दिशाच वेगळ्या आहेत’; अमोल कोल्हेंची पोस्ट चर्चेत
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे मागील काही काळापासून सातत्याने आपल्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत आहेत. केंद्रासह राज्यातील भाजप नेत्यांसोबत वारंवार होणाऱ्या भेटीगाठी आणि सूचक राजकीय वक्तव्यांमुळे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र स्वत: खासदार कोल्हे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. अशातच अमोल कोल्हे यांनी आज केलेल्या एका…