संजय कदम रामदास कदमांचं राजकीय करिअर संपवू शकतात का?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिंदे गटात गेलेले रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांना धक्का देण्यासाठी ठाकरे गटाने आता रणनीती आखली आहे.

माजी आमदार संजय कदम यांची शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घरवापसी होणार आहे. पुढील पंधरा दिवसात हा प्रवेश होणार अशी खात्रीलायक माहिती आहे. स्वतः उद्धव ठाकरे यावेळी हजर राहणार असून खेडच्या गोळीबार मैदानामध्ये जाहीर सभा देखील होण्याची शक्यता आहे.

सध्या संजय कदम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे रामदास कदमांवर काय बोलणार याबाबतच्या चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. त्याला कारण म्हणजे मूळचे शिवसैनिक असलेले माजी आमदार संजय कदम यांची घरवापसी.

राज्यात शिवसेना फुटीनंततर आणि नवीन सत्तांतरानंतर रामदास कदमांनी शिवसेनेचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला. आणि तेव्हापासून ते सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांच्या मदतीने अनिल परबांना अडचणीत आणण्यास रामदास कदमांचाच हात असल्याचे समोर आले होते. या संदर्भातली त्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हयरल झाली होती. त्यामुळे कदम बॅकफूटवर होते.

आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे फडणवीस सरकारमध्ये कदमांकडे असणारे पर्यावरण खाते ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरेंकडे गेल्याने ते कमालीचे दुखावले होते. ठाकरेंना सोडचिट्ठी दिल्यानंतर उघडपणे त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे कदमांना रोखणे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाचे होते.

आणि याचाच भाग म्हणून दापोली-खेड-मंडणगड या विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि योगेश कदम यांना धक्का देण्याची रणनीती उद्धव ठाकरे गटाकडून आखली गेल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेनेतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये संजय कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याबाबतची सर्व तयारी आणि बोलणी देखील पूर्ण झाली आहेत.

संजय कदम यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी, सहकारी यांच्याशी शिवसेनेतील प्रवेशबाबत चर्चा केली आहे.संजय कदम हे सध्या राष्ट्रवादीत असून लकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

कोण आहेत संजय कदम?

संजय कदम हे २०१४साली शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर शिवसेना उमेदवार असलेल्या सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला होता. मात्र, २०१९च्या निवडणुकीत त्यांना तत्कालीन शिवसेना उमेदवार असलेल्या योगेश कदमांकडून तब्बल दहा हजारांच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या ठिकाणी योगेश कदम हे आमदार झाले.

या नंतर भाजप बरोबर सत्ता स्थापन करण्यास शिवसेनेने नकार दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. राष्ट्रवादी आणि शिवसेना मित्रपक्ष झाले. मात्र, तरीही कदमां मधील वैर कमी झाले नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजप शिंदेच सरकार अस्तित्वात आले. या नंतर ठाकरेंकडून साईडलाईन झालेल्या नेत्यांनी शिंदेच्या जवळ जाणे पसंद केले होते. त्यामुळेच आपली साथ सोडलेल्या नेत्यांविरुद्ध देखील मोर्चेबांधणी सुरु केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *