मंत्रिमंडळ विस्तार रखडला, शिंदेंना आमदारांवर ‘भरवसा नाय का’ ?

एकनाथ शिंदे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबईः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर मंत्री मंडळ विस्तार झाला होता. भाजप व शिंदे गटात वाटाघाटी झाल्यांनरच विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला.

महिला मंत्री मंडळ विस्तार होताच शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या मंत्री मंडळ विस्तारात नाराज आमदारांना मंत्री पद मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र, दुसऱ्या मंत्री मंडळ विस्तारानंतरही शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले तर ते वेगळा मार्ग निवडू शकतात, म्हणूनच दुसऱ्या टप्प्यातील मंत्री मंडळ विस्तार झाला नसल्याचं बोललं जात.

महायुतीच्या सरकारची लवकरच सर्वात मोठी परीक्षा होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्पात या सरकारचा कस लागणार आहे. यावर हे सरकार किती तग धरेल, हे ठरेल, असं विरोधकांकडून सांगण्यात येतंय.

अशातच मंत्री मंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी मोठं विधान केलंय. ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल. त्यानंतर सर्वच चर्चांना विराम मिळेल.

मंत्री मंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाकडून सूचक विधान आल्यानं येणाऱ्या हिवाळी अधवेशनाकडे विशेष लागलेलं आहे.

भाजप व शिंदे गटाकडून सरकार स्थिर असल्याचं सांगण्यात येतं, मग मंत्रिमंडळ विस्तारास कशामुळे विलंब होतोय. एकनाथ शिंदेंना आमदारांच्या संभाव्य नाराजीची भीती आहे का ? त्यांना आमदारांवर भरवसा नाही का ? असे अनेक सवाल यामुळे उपस्थित होत आहेत.

मात्र, विरोधक सांगतात तसं, मंत्री मंडळ विस्तारानंतरही शिंदे गटातील नाराजांची संख्या वाढत जाणार का ? या नाराजीचा सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *