‘या’ दोन राज्यातील बससेवा बंद
भोपाळ : राज्यात वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर राज्यभरात अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून निर्बंध लावण्यात आले आहे. पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्णावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मागील चोवीस तासात २५ हजार ८३३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत २३,९६,३४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील २१,७५,५६५ रुग्ण बरे झाले आहेत तर ५३ हजार १३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात मुंबईत फक्त २ हजार ८७७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी महाराष्ट्रात २३ हजार१७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
मध्यप्रदेशमध्ये काल दिवसभरात ९१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका माणसाचा मृत्यू झाला आहे आणि ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मध्यप्रदेशात आतापर्यंत २,७१,९५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्यातील २,६२,०३१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात ६ हजार ३२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ३ हजार ८९४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्यप्रदेश सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत २१ मार्च पासून ३१ मार्च पर्यंत आंतरराज्य बससेवा थांबवण्यात येणार आहे.