मंगळ मिशनमधील रॉकेट जळून खाक

वॉशिंग्टन: उद्योगपती एलन मस्क यांच्या मार्फत मंगळावर मानवी वस्ती वसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने स्टारशिप एसएन१० या रॉकेटने अवकाशात उड्डाण घेतले. अश्या प्रकारची ही पहिलीच घटना होती. परंतु एकही तांत्रिक अडचण आल्यामुळे पृथ्वीवर उतरल्यानंतर १० मिनिटांतच रॉकेटचा भीषण स्फोट झाला.
टेक्सास येथील लाँचपॅडवरून या प्रोटोटाइप रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. चाचणी यशस्वी झाल्याचे स्पेसएक्सने जाहीर करताच काही मिनिटातच भयंकर स्फोट झाला आणि या अपघातामध्ये स्टारशिप एसएन१० लाँचपॅडवरच जळून खाक झाले. रॉकेट सुखरूप लँड केल्याचे एलन मस्क यांनी आपल्या टीमला शुभेच्छा दिल्या पण काही मिनिटातच ही दुर्दैवी घटना घडली.
या अपघाताविषयी अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत. रॉकेट लँड करतांना लेग बेसशी जोडले गेले नाही म्हणून अस्थिर झाले असल्याचे काही सूत्रांकडून समजते आहे. तर मिथेन गॅसची गळती झाल्यामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वीदेखील एसएन८ आणि एसएन९ रॉकेटचा लँडिंग करताना स्फोट झाला होता.
स्टारशिपच्या माध्यमातून २०२३ पर्यंत तब्बल १२ अंतराळवीर चंद्रावर पाठवणे आणि अन्वेषकांना स्थायी स्वरूपात मंगळ ग्रहावर वसवण्याचे स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क यांची योजना आहे.
एअरोस्पेस छायाचित्रकार जॅक बेयर यांनी यासंबंधी ट्वीट करून या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.