बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

‘रामसेतू’ चे ४५ ज्युनियर आर्टिस्ट कोरोनाबाधित
मुंबई: अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आज त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकती बिघडल्यामुळे अक्षय कुमारला अचानक रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अक्षयनं स्वत:ला होम क्वारंटाइन केलं होतं. त्यानं आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी कऱण्याचं आवाहन देखील केलं होतं.
एक दिवस होम क्वारंटाइन राहिल्यानंतर अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे अक्षय कुमारला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अक्षय कुमारनं काल स्वत: ट्वीट करून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती.
अक्षय कुमारला मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अक्षय कुमार लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तर या सर्वांचे आभार अक्षय कुमारनं मानले असून मी लवकर परत येईन असा विश्वास सुद्धा त्याने व्यक्त केलाय.
याआधी सचिन तेंडुलकर, अक्षय पटेल आणि कोहलीच्या संघातील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अनुपमा सीरियलमधील अभिनेत्रीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याआधी आलिय भटलाही कोरोनाची लागण झाली आहे. क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात कोरोनाचं संकट वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 4, 2021
‘रामसेतू’ चं शूटिंग थांबवलं
बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारला काल कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यापूर्वी त्याने आपला आगामी चित्रपट ‘रामसेतू’ ची शुटिंग सुरू केली होती. दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याने सुरू असलेल्या चित्रपटाचे काम थांबवावे लागले आहे. यातच आता त्या चित्रपटाच्या सेटवरील तब्बल ४५ लोक कोरानाबाधीत झाल्याची माहिती समोर आलीये.
‘रामसेतू’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते सर्वजण मड बेटावर सामील होणार होते. परंतु, त्यातच ४५ ज्युनियर आर्टिस्ट पॉझिटिव्ह आल्याने चित्रपटाचे काम बंद केले आहे.