बॉडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनामुळे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन

बडोदा : शरीरशौष्ठव विश्वातून वाईट वृत्त समोर येत आहे. शरीरशौष्ठवाचा सर्वोच्च किताब पटकावणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे वयाच्या ३४ व्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झाले आहे. जगदीश लाड यास ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना रुग्णालयात त्याने आपला प्राण सोडला आहे. त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रिय स्पर्धामध्ये महाराष्ट्र आणि देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. जगदीशच्या अशा अचानक जाण्याने बॉडीबिल्डिंग क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक जणांना हिरावून घेतले आहे त्याच्या फटका बॉडीबिल्डिंग क्षेत्राला सुद्धा बसला आहे. बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. जगदीश मूळचा कुंडल जिल्हा सांगली येथील असून नवी मुंबईत तो वास्तव्यास होता. नंतर वडोदरा येथे त्याने आपली स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती व तेथेच स्थायिक झाला होता. जगदीश याने नवी मंबई महापौर श्रीचा किताब पटकावला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये गोल्ड मेडल, मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकले होते. व वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळविले होते. जगदीश याच्या निधनानंतर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन व मुंबई असोशिएसनने शोक व्यक्त केला आहे.