उपराष्ट्रपतींपाठोपाठ RSS च्या ‘या’ बड्या नेत्यांच्या ट्विटर हँडलवरुनही ब्लू टिक हटवली

वृत्तसंस्था : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली होती. यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवर संघातील सुरेश सोनी आणि अरुण कुमार यांच्यासह इतरही वरिष्ठांच्या नावसमोरील ब्लू टीकही ट्विटरनं हटवली आहे. खात्रीशीर, विश्वसनीय आणि सक्रिय असलेल्या ट्विटर खात्याबद्दल इतर वापरकर्त्यांना समजण्यासाठी ट्विटरकडून ब्लू टिक दिली जाते. ट्विटरच्या मनमानी कारभारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
ट्विटरने केवळ व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरीलच ब्लू टिक काढलेली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकली असल्याची माहिती संघाचे राजीव तुली यांनी दिली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्याची ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात आला असल्याचं शनिवारी निदर्शनास आलं. यावरून ट्विटरवर टीकाही सुरू झाली. त्यानंतर आता ट्विटरने पुन्हा ब्लू टिक दिली आहे.
सरकारच्या नव्या गाइडलाइनवरून ट्विटर आणि सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. नव्या गाइडलाइन लागू करण्याबाबत ट्विटरने अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. ट्विटरनं आता देशातील मोठमोठ्या नेत्यांच्या ट्विटर हँडलची ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे.