Friday, October 7, 2022
Homeराजकीयभाजपचे लक्ष आता गृहमंत्री

भाजपचे लक्ष आता गृहमंत्री

वाझे प्रकरणात मागितला राजीनामा

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर त्यांना राजीनाम द्यावा लागला होता. त्यांनतर आता अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

यानंतर भाजपकडून हा मोर्चा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना टार्गेट करण्यात येत आहे. भाजप कडून अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी जोर लावण्यात येत आहे. मात्र कालच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून गृहमंत्री अनिल देशमुखच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता भाजपने राज्यात घडलेल्या काही गुन्हेगारी घटनाबाबत अनिल देशमुख यांना प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सचिन वाझेचे प्रकरण फार गंभीर आहे. मात्र याचे गांभीर्य लक्षात न घेता वाझेला मोकाट सूट देणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना तत्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंबई पोलिसांचा कसलाही तपास नाही. मुळात ठाकरे सरकारच्या ताटाखालचे मांजर होणाऱ्याकडून जनतेच्या सुरक्षेची काय अपेक्षा करणच चूक!

शोले आजच्या काळात घडले असते तर तो काहीसा असा असता

रात्रंदिवस मेहनत करून पोलीसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच… पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही, मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का?

सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे, मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो स्वताच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरु राहील तर आपल्या माता भगिनी कशा सुरक्षित राहतील?

विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृखात त्यांच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री गाढ झोपेत आहेत.

मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो, त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्याच्या दबावामुळे…मग या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख साहेब तुम्ही काय केले? तुमच कर्तव्य विसरलात का

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments