|

तन्मय फडणवीसांच्या लसीकरणावर भाजपचे स्पष्टीकरण

BJP's explanation on Tanmay Fadnavis' vaccination
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांचा लस घेतानाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. नियमांच उल्लंघन करून लसीकरण करण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे. यावर आता संपूर्ण प्रकरणावर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

महाराष्ट्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता तर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीला कोरोनाची लस दिली असती. अजूनही त्यांनी तसे केलेले नाही.का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करताय? शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतली होती, त्याचे आधी बोला असा उलट सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला.

नेमके काय आहे प्रकरण
तन्मय फडणवीस यांनी सोमवारी नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीचां दुसरा डोस घेतला. त्याने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केला होता. टीका झाल्यानंतर तन्मयने हा फोटो डिलीट केला. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात येत आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *