Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचाभाजपकडून माझ्या नावाचा अपप्रचार

भाजपकडून माझ्या नावाचा अपप्रचार

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. अनेकांना बेड, ऑक्सिजन, औषध वेळेत मिळत नसल्याने आपला जीव गमवावा लागतो आहे. सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात गुंतले आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन वरून मोठा वाद सुरू आहे. काल दुपारी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी “भाजपकडून राज्य सरकारसाठी रेमडेसिविरचांसाठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबद्दलची कल्पना मला होती. रेमडेसिविरचे उत्पादन करणारे कंपनीचे प्रतिनिधी आणि भाजपच्या नेत्यांची बैठक माझ्याच घरी झाली होती. त्यांनी
रेमडेसिविरचां साठा राज्य सरकारला देण्याची तयारी दर्शविली होती” असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मात्र महाविकास आघाडीतील इतर मंत्र्यांनी यावर आक्षेप घेतल्या नंतर रेमडीसीविर इंजेक्शन चा पुरवठा व साठ्यावरून माझ्या नावाचा भाजप कडून अपप्रचार करण्यात येत असल्याचा आरोप राजेंद्र शिंगणे यांनी केला. याबाबत त्यांनी मंगळवारी रात्री ट्विट करून भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे असा आरोप केला.


काय म्हणाले अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे
“रेमडीसीविर इंजेक्शन चा पुरवठा व साठा यावरून उलट सुलट तर्क लावल्या जात आहे आणि यावरून भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे. कुठलाही पक्ष हा वयक्तिक रित्या इंजेक्शन साठा खरेदी करू शकत नाही, त्यांना तो सरकारला द्यावा लागतो. भारतीय जनता पक्ष रेमडीसीविर विकत घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोशल मीडिया वर सुरू असून ते सपशेल चुकीचं आहे. कुठल्याही पक्षाला रेमडेसीविर वयक्तिक रित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही ते त्यांना सरकार लाच द्यावे लागतील.
यावरून भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा जो अपप्रचार करत आहे त्यानिमित्ताने हा खुलासा देत आहे. असे ट्विट राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments