|

भाजप खासदाराच्या सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मोहनलालगंज मतदारसंघाचे भाजपचे खासदार कौशल किशोर हे गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आहेत. कौशल किशोर यांच्या मुलानं-आयुष किशोर यानं स्वत:वर गोळी झाडल्याचा बनाव रचल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर आयुष फरार असल्याचंही सांगण्यात आलं. आयुषला त्याच्याच वडिलांच्या दिल्लीतल्या घरी असल्याचा दावा याआधी अंकितानं मीडियासमोर केला होता.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पहाटे भाजप खासदार कौशल किशोर आणि आमदार जय देवी यांच्या मुलावर अर्थात आयुष किशोर याच्यावर दोन बाईकस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडली. पोलीस तपासात या घटनेमागचं सत्य समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला.

भाजप खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुषनं प्रेमविवाह केल्यानंतर आयुष आपल्या नाराज कुटुंबीयांपासून वेगळा राहत होता. ३ मार्च रोजी पहाटे गोळीबाराच्या घटनेनंतर आयुषला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आपल्यावर कुणी गोळीबार केला याची माहिती नसल्याचं, परंतु पत्नी आणि मेव्हण्यावर संशय असल्याचं त्यानं सांगितलं आणि त्याच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली. तपास सुरू झाल्यानंतर आयुषने या गोळीबाराच्या प्रकरणात पाच – सहा जणांना अडकवण्यासाठी स्वत:च आपल्यावर गोळीबार करवून घेतला होता हे समोर आलं.

या सगळ्यांनंतर त्याची पत्नी म्हणजेच कौशल किशोर यांच्या सुनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात तिने आपण आपलं आयुष्य संपवण्यासाठी जात असल्याचं म्हटलं होतं. ‘आयुष माझी कोणतीही चूक नाही. तरीही तू मला एकटं सोडलंस. माझी काहीही चूक नसताना मला अडकवण्यात आलं. खोटे आरोप लावण्यात आले, माझी कुठे चूक झाली? तुझ्याशी लग्न केलं, तुझ्यासोबत राहिले हीच माझी चूक झाली. कोणत्याही परिस्थितीत राहिले तरी मी तुझ्यासोबत आनंदी होते. तू माझ्यासोबत चुकीचं वागलास, माझ्याकडे जगण्याचं कोणतंही कारण आता उरलेलं नाही’ असं या व्हिडिओत अंकिता म्हणताना दिसतीये.

‘कुणाशी आणि किती लढू. तुझ्याकडे खासदार वडील आहेत, आमदार आई आहे. कुठेही गेले तरी माझं कुणीही ऐकून घेणार नाही. मी कुणाशी लढू शकत नाही. सगळे खोटं बोलत आहेत. तुझ्या कुटुंबीयांनी मला जगण्याच्या लायकीचं सोडलेलं नाही.  माझ्या मृत्यूला तूच कारणीभूत आहेस, तुझं संपूर्ण घर, कुटुंब जबाबदार आहात’ असंही अंकितानं या व्हिडिओत म्हटलंय. दरम्यान कौशल यांच्या कुटुंबातील अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौशल किशोर यांच्या सुनेने घराबाहेर येऊन आपल्या हाताची नस कापली असून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *