भाजपच्या खासदार म्हणाल्या जिल्हाधिकाऱ्यानी रेमडेसिवीरचा साठा बाहेर विकला!

नंदूरबार : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाद थांबायला तयार नाही. तुटवडा, काळाबाजार यावरून मोठे राजकारण तापले आहे. अशा वेळी नंदुरबारच्या भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी गंभीर आरोप केले आहे. नंदुरबार जिल्ह्याला रेमडेसिवीरची गरज आहे. अस असतांना जिल्हाधिकारी आणि वेलनेस सेंटरणे मिळून रेमडेसिवीरचा साठा बाहेर विकल्याचा गभीर आरोप गावित यांनी केला आहे.
नंदुरबार मधील कोरोनाची परिस्थिती अवघड बनली आहे. नंदुरबार जिल्हा आणि मतदारसंघात प्रत्येक गावात कोरोना बाधित आढळून येत आहे. रुग्णालयात रेमडेसिवीर गरज भासत आहे. मला दिवसातून प्रत्येक रुग्णालयातून डॉक्टरांनी फोन करून विचारले कि, ताई आमच्या कडे इतके रुग्ण आहे मात्र रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळाले नाही. रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्याकडे वारंवार विनंती केली. ज्या प्रमाणे रोटरी वेलनेस सेंटरला इंजेक्शन उपलब्ध करून दिले, तसेच इतर रुग्णालयांना हे इंजेक्शन उपलब्ध करून द्या. पण या बाबत जिल्हाधिकाऱ्यानी कुठलाही निर्णय घेतला आहे. शेवटी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यानी ५०० इंजेक्शन उपलब्ध करून दिले. रोटरी वेलनेस सेंटरला १ हजार इंजेक्शन देण्यात आले. रुग्णालयाकडून माहिती विचारली असता इंजेक्शन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. रोटरी वेलनेस हे इंजेक्शन बाहेर विकले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मिळून हे काम केल्याचा अम्भीर आरोप खासदार डॉ. हिना गावित यांनी केला.