विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भुवनेश्वर : ओडिशा विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे विधानसभेत गोंधळ उडाला होता. सुभाष चंद्र पाणीग्रही असे भाजप आमदाराचे नाव आहे. ते देवगड विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे.

ओडीशातील धान्य उत्पादन शेतकऱ्यांचा मुद्दा भाजप आणि कॉंग्रेस याविरोधी पक्षांकडून विधानसभेत लावून धरला आहे. धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्तधारी पक्षाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. सरकारच्या धान्य उत्पादनाच्या भूमिकेला विरोध करत विधानसभेत भाजप आमदार सुभाष चंद्र पाणीग्रही यांनी सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

सरकारच्या धोरणाला विरोध करतांना भाजप, कॉंग्रेस या विरोधी पक्षाने सभागृहात गोंधळ घातला. यामुळे दोन वेळा सभागृह तहकूब करावे लागले. संध्याकाळी ४ वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले. त्यावेळी अन्न मंत्र्यांनी निवेदन वाचण्याची सुरुवात केली. यावेळी पाणीग्रह उभे राहिले आणि त्यांनी खिशातून सॅनिटायझर बॉटल बाहेर काढली आणि ते पिण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या आमदारांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यानंतर विधिमंडळ कामकाज मंत्री बी. के. अरुख आणि प्रमिला मलिक यांनी देखील त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. पाणीग्रहीकडून सॅनिटायझरची बॉटल हिसकाविण्याचा प्रयत्न केला.

यानंतर पाणीग्रही म्हणाले, मी अगोदरच या विषयासंदर्भात आत्महत्या करणार असा इशारा दिला होता. याकडे सरकारने गांभीर्याने पहिले नाही. बाजारात धान्य विकताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे मी विधानसभेत सॅनिटायझर पिले असल्याचे पपाणीग्रही यांनी सांगितले.   


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *