|

भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

ashish shelar
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे आशिष शेलार यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द आशिष शेलार यांनीच आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती ट्वीट करून दिली आहे.
माझी कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेत आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.
तसंच, माझ्या संपर्कात जे कुणी कार्यकर्ते, पदाधिकारी असतील त्यांनी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी, कोरोनाचे लक्षण जाणवल्यास चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही आशिष शेलार यांनी केलं.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजार पार!
दरम्यान,राज्य सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात कालपर्यंत एकूण २९,०५,७२१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ एवढे झाले आहे.
काल राज्यात ५८,९५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर २७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १,६४ टक्के एवढा आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *