भाजप नेते निवडणूक ‘मोड’ वर
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमित शहा यांच्या कडून दौरे सुरु
पुणे: आगामी ५ राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप कडून जोरदार तयारी सूर झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर जात आहेत. तर गृहमंत्री अमित शहा आसाम मध्ये रॅली काढणार आहे.
तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ मे आणि जून महिन्यात संपुष्टात येणार आहे. या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपच्या वतीने मिरवणुका, प्रचारसभा काढण्यात येत आहे. तर या राज्यात अनेक भाजपचे वरिष्ठ नेते ठाण मांडून बसले आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा पुद्दुचेरी आणि केरळ दौऱ्यावर आहेत. तेसच पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रियंका गांधी सतत दौरे करत आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू आणि पद्दुचेरीच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. तर अमित शहा आसाम दौऱ्यावर असून २ रॅली काढणार आहेत.
पश्चीम बंगाल मध्ये भाजप कडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. गृहमंत्री प्रत्येक महिन्यातील २ दिवस पश्चीम बंगालमध्ये जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुद्धा पश्चीम बंगालचा दौरा केला आहे. तृणमुलचे अनेक मोठे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. तर अनेक नेते भाजप मध्ये प्रवेश करण्याची मनिषा घेऊन आहेत.
केरळ विधानसभा पार्श्वभूमीवर मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे केरळ विधानसभेच्या निवडणुकीत चुरस अधिक वाढली आहेत. तर पिद्दुचेरी येथील कॉंग्रेसच्या काही आमदाराने राजीनामा देत भाजप मध्ये प्रवेशाचे संकेत दिले आहेत.