भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

BJP leader Pankaja Munde infected with corona
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

बीड : भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी स्वतः फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे.
काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांचा अंगरक्षक गोविंदा यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या गेल्या होत्या. तसेच अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुद्धा कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या गेल्या होत्या. यानंतर कोरोना बाधीतांच्या संपर्कात आल्याचे लक्षात घेवून पंकजा मुंडे या काही दिवसापूर्वीच घरीच आयसोलेटे झाल्या होत्या. त्यांची चाचणी करण्यात आल्या नंतर गुरुवारी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत त्यांनी फेसबुक वर पोस्ट लिहिली असून कोरोना झाल्याचे सांगितले आहे.
“मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. मी ऑलरेडी आयसोलेटे आहे. कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेल..माझ्या समवेत दौऱ्यात असणाऱ्यांनी टेस्ट करून घ्यावी काळजी घ्यावी” असे आवाहन सुद्धा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून त्या सुद्धा घरीच आयसोलेटे आहेत. देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *