भाजप नेते आशिष शेलार यांना सुद्धा रिमडेसिविर मिळालं नाही

मुंबई: गेल्या आठ दिवसांपासून कोरोना बाधीतांच्या नातेवाईकांची रिमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठीची धडपड पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने रिमडेसिविरचां तुटवडा निर्माण होवू नये म्हणून जिल्हाधिकार्यान मार्फत सर्व हॉस्पिटल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही राज्यात इंजेक्शनचां तुटवडा जाणवत आहे. यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात आजही रिमडेसिविरचां काळाबाजार होत आहे. यामुळे कोरोना झालेल्या आमदार आशिष शेलार यांना
रिमडेसिविर मिळत नसल्याचा दावा प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना केला.
यावेळी प्रसाद लाड म्हणाले, राज्यातील रिमडेसिविर इंजेक्शनचां तुटवडा पाहता भाजप नेत्यांनी. विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामधे दमन मधील एका कंपनीने ५० हजार इंजेक्शन देण्याचा आश्वासन दिले आहे. मात्र त्या कंपनीला राज्य सरकारने पत्र न दिल्याने अद्याप रिमडेसिविर मिळाले नाही असा दावा त्यांनी यावेळी केला.
रिमडेसिविर इंजेक्शनचां काळाबाजार करू नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली. प्रधान सचिन प्रदीप व्यास यांनी कोणत्या सेंटर वर किती स्टॉक आहे याची माहिती दिली आहे. मात्र सेंटरवर फोन केला असता साठा नसल्याचे सांगण्यात आले.
आमचे नेते आशिष शेलार हॉस्पिटल मध्ये आहे त्यांना रिमडेसिविर उपलब्ध करून द्यायचे आहे. पण लीलावती मध्ये सुध्दा रिमडेसिविर उपलब्ध नाही. असे म्हणत आशिष शेलार यांना इंजेक्शनची गरज आहे मात्र मिळत नसल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला.