भाजपच्या राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, इथे बदल घ्या ; संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं

भगतसिंह कोश्यारी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यामुळे राज्यात गदारोळ मजलाय. विरोधकांकडून राज्यपालांचा निषेध सुरु असून त्यांना हटवण्याची मागणी उचलून धरू लागेलत.

दरम्यान, शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीये.

”महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली…एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले.
छत्रपती शिवाजीमहाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? इथे बदला घ्या बदला’, असं संजय राऊत म्हणालेत.

२०१९ मध्ये शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली, म्हणून मी बदल घेतला, असं देवंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *