बर्थडे स्पेशल: विविध कलेतला मुसाफिर पोहोचला पन्नाशीत !!

“दिलो मे अपनी बेताबिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो तुम.” हा जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमातील संवाद सगळ्यांच्या परिचयाचा आहे. हा “संवाद” आपल्या विशिष्ट आवाजात आणि शैलीत लोकांपर्यंत पोहोचवणारा अभिनेता म्हणजे फरहान अख्तर.
आज फरहान अख्तर चा वाढदिवस. फरहान हा एक अभिनेता म्हणून सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. पण या बरोबरच फरहान हा एक निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सुद्धा आहे. फरहान चा जन्म ९ जानेवारी १९७४ रोजी मुंबई येथे जावेद अख्तर आणि हनी इराणी यांच्या घरी झाला.
फरहान हा प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. खूप कमी जणांना माहित असेल पण फरहान ने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अभिनेता म्हणून नाही तर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून केली. त्याने १९९९ मध्ये रितेश सिध्वानी बरोबर एक्सेल एंटरटेनमेंटची स्थापना केली ज्यात ते अनेक चित्रपटांची निर्मिती करत आले आहेत.
सर्व बाजूने गाजलेला सिनेमा “दिल चाहता है” हे फरहान च सिनेविश्वत मुख्य पदार्पण. हा केवळ त्याचा पहिला सिनेमा नसून त्याल विविध प्रतिष्ठीत पुरस्कार प्राप्त करून देणारा चित्रपट ठरला. फरहान ला या चित्रपटासाठी filmfare सह राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला. त्यानंतर फरहान ने ‘लक्ष्य’ (२००४), डॉन(२००६),डॉन(२) असे सिनेमे दिग्दर्शित केले. यासोबत त्याने अनेक सिनेमांसाठी लेखन ही केले आहे, यात आमिर खान चा ‘तलाश’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे चित्रपट येतात. फरहान ने ‘positive’ नावाचा लघुपट देखील दिग्दर्शित केलाय.
फरहानने त्याचं अभिनय क्षेत्रातील पदार्पण तुलनेने उशिरा केला. २००८ मध्ये आलेला रॉक ऑन ह्यात त्याने पहिल्यांदा अभिनय केला. याव्यतिरिक्त तो त्याच्या बऱ्याच भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. भाग मिल्खा भाग या मिल्खा सिंग यांच्यावरील सिनेमात त्याची भूमिका विशेष गाजली. यासोबतच ‘दिल धडकने दो’, ‘वजीर’, ‘तुफान’ हे त्याचे आणखीन काही चित्रपट.
मधल्या काही काळात सिनेविश्वात नेपोटिसमचा विषय जोर धरून होता. या सगळ्या प्रकरणात अनेक स्टार्सच्या मुलांवर बोट उचलण्यात आले, बारकाईने पाहिलं तर या सगळ्या प्रकरणात फरहान कुठेच झळकला नाही. एवढ्या प्रसिद्ध आणि गुणी कलाकाराचा मुलगा असून देखील त्याने त्याची वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली आह, ती फक्त त्याच्या कलेच्या आणि गुणांच्या जोरावर, त्याची ही कला आणि सर्व गुण आपल्याला सिनेमातून पाहिला मिळतात.
फरहान सिनेविश्वात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतो. उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक या सर्वांसोबत तो एक गायक देखील आहे. बहुतांश सिनेमात त्याने उत्तम गाणी गायिली आहेत. फरहानच्या व्यक्तिमत्वाचे आणि कलेचे विविध पैलू ठळकरीत्या वेळोवेळी अधोरेखित होत राहतात ते त्याच्या विस्तीर्ण कामामुळे.
फरहानच आतापर्यंतच काम पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की तो विविध प्रकारच्या सिनेमांचा भाग राहिला आहे . दिल चाहता है मध्ये त्याने त्या काळातील युवकांचे विचार त्यात दर्शविले आहेत. तर लक्ष्य मध्ये त्याने एक आळशी मुलाची कथा दाखवली आहे, जो नंतर ध्येयासाठी मेहनत करतो. त्यात त्याने भारतीय सेनेबद्दल ही महत्वपूर्ण पैलू मांडले आहेत. त्याने अभिनय करताना देखील हीच विविधता राखली.
रॉक ऑन मध्ये त्याने एक rockstar साकारला तर कार्तिक कॉलिंग कार्तिक मध्ये त्याने बुजरे आणि बिनधास्त असे दुहेरी पात्र साकारले. त्याचे काही सिनेमे हे ‘feelgood’ या प्रकारातल्या ही आहेत. तसेच त्याने मिल्खा सिंग यांच्या भूमिकेत जीव ओतला. मिल्खा सिंग तरुणपणी कसे असावेत असा प्रश्न ज्याला पडला असेल त्याला त्याचे उत्तर तो चित्रपट पाहून नक्कीच मिळेल. वजीर आणि द स्काय इज पिंक या मध्ये त्याने गंभीर भुमिक ही केल्या. २०२१ मध्ये आलेल्या तुफान मध्ये त्याच्या शरीरयष्टि चे खूप कौतुक झाले.
जितकी विविधता त्याच्या अभिनयामध्ये आढळते तितक्याच विभिन्न प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या आहेत. एवढे काम करून देखील तो कोणत्या वादामध्ये बहुतेक्च सापडला. अशा विस्तृत कलाकाराला आणि व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!