पालघरमध्ये कोरोनासोबत बर्ड फ्लूचा शिरकाव
पालघर: दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने काही बंधने पाळावीच लागतील असे आदेश दिले आहेत. अन्यथा, लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अश्यातच मुंबई मध्ये पालघर येथे कोरोना बरोबरच आता बर्ड फ्लू चा शिरकाव झाला आहे. एक संकट संपत नसताना मुंबई महानगरपालिकेला दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बर्ड फ्लू चा शिरकाव पालघर मध्ये झाला असून शहरातील सूर्या कॉलोनीजवळ स्थित असलेल्या शासकीय कुक्कुटपालन केंद्रातील कोंबडयांचे मृत अवशेष सापडले आहे. अचानक झालेल्या मृत्यू मुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. शासकीय कुक्कुटपालन केंद्रात लागोपाठ ४५ कोंबडयांचा मृत्यू झाला आहे. या कोंबद्यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि संशयास्पद असल्यामुळे पुणे प्रयोगशाळेत त्यांचे अहवाल पाठवण्यात आले असून हे अहवाल सकारात्मक आले आहे. त्यात यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.