निकिता तोमरच्या मृत्यूमध्ये तुम्हा सर्वांचा मोठा हात: कंगना

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: २६ ऑक्टोबर २०२० रोजी फरीदाबादच्या बल्लभगढ येथे निकिता तोमर नावाच्या एका युवतीवर कॉलेज बाहेर गोळी मारून हत्या करण्यात आली होती. तौसीफ नावाच्या एका मुलानं निकिताला तिच्या कॉलेजबाहेर गोळी मारली होती. हा घटनेच सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सगळीकडे खळबळ माजली होती. मीडिया रिपोर्टनुसार तौसीफवर मिर्झापूर २ मधील व्यक्तिरेखा मुन्नाचा खूप मोठा प्रभाव होता. जेव्हा निकितानं त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला तेव्हा त्यानं तिला गोळी घालून तिची हत्या केली.

ही घटना बरीच चर्चेत आली होती फरीदाबाद मधील या प्रकरणावर न्यायालयानं आपला निर्णय दिला. या प्रकरणी आरोपी तौसीफ आणि रेहान यांना न्यायलयानं दोषी ठरवलं आहे. आता ही घटना मात्र नव्याने चर्चेत आली आहे. अभिनेत्री कंगना रानौतने निकिता तोमरच्या हत्येला चक्क फरहान अख्तरला जबाबदार धरलं आहे. न्यूज एजन्सी ANI ने याबाबतचं ट्वीट केल्यानंतर हेच ट्वीट रिट्वीट करत कंगनानं मिर्झापूर २ चा निर्माता फरहान अख्तर निकिताच्या हत्येसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

कंगनानं आपल्या ट्वीमध्ये लिहिलं, ‘या मुलांची हिंसा किंवा गुन्हेगारीची कोणतीही पार्श्वभूमी नाही. मुख्य आरोपीनं न्यायालयात आपल्याला या मुलीनं आपल्याला नकार दिल्यानंतर तिला मारण्याची प्रेरणा मिर्झापूर सीरिजवरून मिळाली होती असं सांगितलं. प्रिय फरहान अख्तर आशा करते की, तुला आता समजलं असेल की, कलेचा लोकांवर किती जास्त प्रभाव पडू शकतो. अशा प्रकारच्या मृत्यूमध्ये तुम्हा सर्वांचा खूप मोठा हात आहे.’

कंगना आणि फरहानमध्ये अशाप्रकारचा वाद हा नवीन नाही. या आधीही कंगना-हृतिक वादात फरहाननं हृतिकला पाठिंबा दिली होता. ज्यानंतर कंगनाची बहीण रंगोली चंडेलनं फरहान अख्तरच्या विरोधात अनेक ट्वीट केले होते. या व्यतिरिक्त फरहान अख्तरचे वडील जावेद अख्तर यांनी देखील कंगनावर आपली प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *