राज्य सरकारचा मोठा निर्णय; सर्वांना मोफत लसीकरण, थोड्याच वेळात नोंदणीस सुरुवात, जाणून घ्या प्रक्रिया

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१ मे पासून देशासह राज्यात सुध्दा १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी करण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक व चिंताजनक आहे. त्यामुळे जलद गतीने लसीकरण होणे गरजेचे आहे. दरम्यान राज्य शासनाने आज घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. याआधी महाविकास आघाडीमध्ये लसीकरणावरून मतभेद झाल्याचे दिसून आले होते तसेच मोफत लसीकरणाच्या श्रेयवादावरुन सुद्धा महाविकास आघाडीमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे या सर्व प्रकरणांवर पडदा पडला आहे.

राज्यात मोफत लसीकरणाची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केलं आहे. दरम्यान १ मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात ५ कोटी ७१ लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी तब्बल १२ कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर ६ हजार ५०० कोटी रुपयांचा भार असणार आहे.

आज पासून १८ वर्षावरील सर्वांसाठी कोरोना लस घेण्यासाठी अशी करावी नोंदणी
१) www.selfregistration.cowin.gov.in या अधिकृत साईट वर जावे
२) Resister / sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करावा
३) काही वेळात एक OTP येईल तो तिथे टाका व क्लिक करा
४) Vaccine Registration फॉर्म भरा
५) Schedule Appointment वर क्लिक करा
६) तुम्ही राहत असेल त्या भागातील पिन कोड टाका (उदा.४११०१६)
७) Session निवडा-सकाळचे किंवा दुपारचे
८) Vaccine center व तारीख निवडा
९) Appointment book करून ती confirm करा
१०) लसीकरणाच्या बाबतची सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर येईल
११) लसीकरणा बाबत आलेला मेसेज केंद्रावर दाखविणे बंधनकारक आहे. तसेच सोबत ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *