Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचारेल्वेचा मोठा निर्णय; देशभरात चालणार 'इतक्या' स्पेशल ट्रेन

रेल्वेचा मोठा निर्णय; देशभरात चालणार ‘इतक्या’ स्पेशल ट्रेन

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर दिसून येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊनचा पर्याय पुढे येत आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होऊन नये म्हणून रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा विचार करता भारतीय रेल्वेने ७० टक्के गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत रेल्वे येत्या दोन आठवड्यात आणखी १३३ गाड्या चालवण्याचा विचार करीत आहे. त्यापैकी ८८ गाड्या समर स्पेशल, तर ४५ गाड्या फेस्टिवल स्पेशल असणार आहेत.
बुधवारी काढलेल्या आदेशात ९ हजार ६२२ विशेष गाड्यांना मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच दररोज देशभरात ७ हजाराहून अधिक गाड्या चालवल्या जातील. गृह मंत्रालयाने कोरोनाव्हायरसविषयी सावधगिरी बाळगल्याने अर्ध्या कर्मचार्‍यांना घरुन काम करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना महामारीपूर्वी, दररोज सरासरी ११ हजार २८३ गाड्या धावत होत्या. सध्या देशात ५ हजार ३८७ उपनगरी गाड्या धावत आहेत. त्यात सर्वात जास्त मध्य रेल्वे क्षेत्र आहे. ज्या अंतर्गत मुंबई आणि पुणे येतात. सध्या मध्य रेल्वे क्षेत्रात ८२ टक्के मेल एक्स्प्रेस आणि २५ टक्के लोकल गाड्या चालविल्या जात आहेत. रेल्वेचा हा निर्णय अत्यंत धक्कादायक मानला जात आहे कारण कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये परप्रांत कामगार नियमितपणे आपल्या घरी परतत आहेत आणि त्याच वेळी ते संक्रमणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत.

देशात गुरुवारी आतापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या
दरम्यान, देशात दुसऱ्या लाटेचा प्रचंड उद्रेक झाल्यानंतर दिवसेंदिवस हे संकट गडद होताना दिसत आहे. देशात गुरुवारी आतापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. तर १०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडलेली असताना भारतासाठी आणखी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जूनमध्ये यात वाढ होताना दिसेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments