बिग बीं च्या नातीची प्रतिक्रिया,कपडे बदलण्याआधी मानसिकता बदलायला हवी.
मुंबई : उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? महिलेच्या गुडघ्यावर फाटलेली जीन्स पाहून मनात प्रश्न येतो की यामुळं समाजात काय संदेश जाईल, मुलांवर कसे संस्कार होतात, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असं तीरथ सिंह यांनी म्हटलं आहे. देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री तीरथ सिंह यांच्या या वक्तव्यावर समाजातील सर्वच स्तरांवरून टीका केली जात आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या हिनं देखील या वक्तव्यावर आपला रोष व्यक्त केला आहे. नव्यानं सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी असं नव्या नंदानं त्यात म्हटलं आहे.
नव्यानं सोशल मीडियावर तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे की, WTF, आमचे कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी. तिनं म्हटलं आहे की, मी अभिमानानं रिप्ड जीन्स घालणार आहे. तिनं पुढं म्हटलं आहे की, मुख्यमंत्री आम्हाला चांगलं वातावरण देऊ शकतात का? एक फोटो शेअर करत तिनं म्हटलं आहे की, मी माझी रिप्ड जीन्स पहनूंगी, धन्यवाद. आणि मी या जीन्सला अभिमानानं घालणार, असंही तिनं म्हटलंय.
दरम्यान तीरथ सिंह रावत यांनी या वक्तव्याबाबत देशातील सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. संस्काराच्या गोष्टी करणाऱ्या या लोकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत कधी बोलणार असा सवाल देखील चतुर्वेदी यांनी केला आहे.