बिग ब्रेकिंग! आमिर खान-किरण रावचा घटस्पोट; १५ वर्षाचं नात संपुष्टात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिर खान व पत्ती किरण यांनी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडली आहे. आमिर आणि किरण गेल्या पंधरा वर्षापासून सोबत आहेत. घटस्फोटा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र या निर्णयामुळे आमिरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
आमिर आणि किरण यांनी २८ डिसेंबर २००५ रोजी लगीन गाठ बाधंली होती. त्यानंतर त्यांनी तब्बल १५ वर्षे सोबत संसार केला आहे. मात्र आता या दोघांनी
वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाबाबत दोघांनीही ऑफिशियल निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
२०११ साली किरणने सरोगसीच्या आधारे मुलाला जन्म दिला. या दोघांना नऊ वर्षांचा आझाद हा मुलगा आहे. त्याआधी आमिरने १९८६ मध्ये अभिनेत्री रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांना जुनैद हा मुलगा आणि आयरा ही मुलगी आहे. २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन्ही मुलांचा ताबा रिना दत्ताला मिळाला.