|

दहावी, बारावीच्या परीक्षा बाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

How to get the result of X? Read detailed
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागच्या आठवड्यात MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली.
दहावी, बारावी हा प्रत्येक विद्यार्थांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. अगोदरच अभ्यासाचा तणाव आणि कोरोनाची वाढती संख्या हा सुद्धा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशा द्यायच्या हा सर्वांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सोबत चर्चा झाली. आणि त्यानंतर हा निर्णय झाल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांचे आरोग्य हा महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. यामुळे दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावीची परीक्षा जून महिन्यात तर बारावीची ही मेच्या शेवटी होईल. यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचे कुठलेही नुकसान होणार नाही. ज्या प्रमाणे राज्य बोर्डाने निर्णय घेतला त्याच प्रमाणे इतरही बोर्डाने परीक्षा पुढे ढकलावी अशा सुचण्या देण्यात येतील असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *